ठळक घडामोडी

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

रिटेल फायनान्स कर्जपुरवठा

 

ग्राहकांना बँकेकडे आकर्षित करणेसाठी सौजन्यशील वागणूक व तत्पर सेवा देवून बँकेमार्फत त्या मनात आत्मीयता निर्माण करणेचे दृष्टीने बँक नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने बँकेच्या सर्वसामान्य ठेवीदारास ठेवी बरोबरच कर्जांच्या सुविधांचा ही लाभ व्हावा व पर्यायाने तो बँकेशी कायमस्वरूपी निगडीत राहावा या उद्देशाने पगारदार नोकर,व्यापारी/व्यावसायिक यांना घर बांधणी, घर/फलाट खरेदी , रो-हाउस खरेदी, गळा खरेदी तसेच नवीन दुचाकी/चार चाकी वाहन खरेदी व छोटे व्यापारी /व्यावसायिक यांना घरगुती कारणांसाठी ,गृह उपयोगी साहित्य खरेदी करणेसाठी सामान्य कर्ज योजना अशा विविध कर्ज योजना राबविल्या जात आहेत. अशा कर्जासाठी किमान ६ महिन्यापूर्वीच्या खातेदार/ठेवीदार असणे आवश्यक आहे.


अ) व्यावसायिक उद्योजक ग्राहक ठेवीदार यांना गृह कर्ज , वाहन कर्ज.
१. कमाल कर्ज मर्यादा २५ लाख
२. व्याजदर १२.५० %
३. घर कर्ज परतफेड मुदत १५ वर्षे व वाहन कर्ज परतफेड मुदत ७ वर्षे (मासिक हप्ता)
४. २ जमीनदार देणे आवश्यक असून, पैकी पहिला जमीनदार शासकीय/निमशासकीय /स्थानिक स्वराज्य संस्था मधील सेवक असणे आवश्यक आहे. तर दुसरा जमीनदार हा व्यावसायिक कि जो आयकर विवरणपत्र धारक असावा .
५. अर्जदाराने त्यांचे मागील ३ वर्षाची आर्थिक पत्रके व आयकर विवरण पत्रक सोबत देणे आवश्यक आहे.
६. सदर  कर्जासाठी किमान दुप्पट रक्कमेचे निर्वेध मालमत्ता तारण देणे आवश्यक आहे.


ब) पगारदार नोकरांचेसाठी घर बांधणी, घर - प्लाट /रो-हाउस /गळा व वाहन खरेदी यासाठी कर्जपुरवठा
१) कमाल कर्ज मर्यादा रु. २५ लाख
२. व्याजदर १२.५०%
३. घर परत फेड मुदत १५ वर्षे व वाहन कर्ज परत फेड मुदत ७ वर्षे (मासिक हप्ता)
४. किमान ३ वर्षे कायम सेवा झाली असली पाहिजे व उर्वरित सेवा कमीत कमी ५ वर्षे असणे आवश्यक आहे .


क) सामान्य ग्राहक /ठेवीदार व वाहन व्यावसायिकांसाठी नवीन दुचाकी / चार चाकी वाहन खरेदी कर्ज
१. एकूण कोटेशनच्या ८०% किंवा कमाल कर्ज मर्यादा रु. ५ लाख
२. व्याजदर १३.०० %
३. परत फेड मुदत ७ वर्षे (मासिक हप्ता)
४. २ जमीनदार देणे आवश्यक असून , पैकी एक जमीनदार शासकीय /निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था मधील सेवक आवश्यक आहे. तर दुसरा जमीनदार हा व्यवसायीक कि जो आयकर विवरण पत्र धारक असावा.


ड ) सामान्य कर्ज योजना
छोट्या व्यावसायिकांसाठी क्याश क्रेडीट कर्ज/ठेवीदार ग्राहकांना गृह उपयोगी वस्तू खरेदी साठी व घरगुती कारणांसाठी मध्यम मुदत कर्ज
१) कमाल कर्जमर्यादा  रु १ लाख
२) क्याश क्रेडीट कर्ज मुदत १ वर्षे / मध्यम मुदत कर्ज परत फेड मुदत कमाल ५ वर्षे (मासिक हप्ता)
३. व्याज दर १३.००%
४. कर्जदाराचे किंवा कुटुंबातील नांवावरील निर्वेध मालमत्ता रजि. मॉर गेज डिड ने तारण देणे आवश्यक आहे.
५. कर्जदार यांचे आर्थिक परिस्थितीची कर्जाच्या कारणासह पूरक अशी कागद पत्रे.