कोअर बँकिंग
डाटा सेंटर व डी आर साईट
बँकेच्या सर्व २१७ शाखा सीबीएस संगणकीकृत असून त्या अनुषंगाने बँकेने स्वतःचे अत्याधुनिक व तांत्रिक दृष्ट्या प्रगत सर्व सोयीने युक्त अश्या डाटा सेंटर व डिझास्टर रिकवरी साईटची स्थापना केली आहे. साईट मध्ये IBM कंपनीचे अत्याधुनिक ब्लेड व रॅक सर्वर्स इंस्टाल केलेले आहेत. बँकेच्या मुख्यकार्यालयामध्ये डाटा सेंटरची उभारणी केली असून डी आर साईट हे बँकेच्या मा.या. विटा शाखेमध्ये उभारण्यात आले आहे.
रूपे डेबिट / केसीसी कार्ड
बँकेने एकूण १.५० लाख रूपे डेबिट कार्डांचे व १,६७,५२५ रूपे केसीसी कार्डांचे वितरण केले आहे.
अ) पॉस व्यवहार – आपल्या बँकेचे रूपे डेबिट कार्ड व रूपे केसीसी कार्ड देशातील कोणत्याही दुकान, मॉल, बझार व हॉटेल मधील पॉस मशीनवर स्वाइप करून वस्तू खरेदी अथवा पेमेंट करता येते.
ब) ई-कॉमर्स - आपल्या बँकेचे रूपे डेबिट कार्ड व रूपे केसीसी कार्डच्या सह्हायाने ऑनलाइन खरेदी करता येते. उदा. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट वरून खरेदी करता येतात. तसेच मोबाईल, D2H रिचार्ज, तिकीट व हॉटेल बुकिंग करता येते.
ए.टी.एम
बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी आजअखेर ३२ ए.टी.एम. सुरु केलेली आहेत.
१) मिरज रोड, सांगली २) महावीर नगर, सांगली ३) मार्केट यार्ड, मिरज ४)नांद्रे ५)आरग ६) दुधगाव ७)मार्केट यार्ड, तासगाव ८) रामानंद भारती सुत गिरणी ९ )कवठे-एकंद १०) इस्लामपूर ग्रामीण ११)आष्टा १२)वाळवा १३)कोरेगाव १४)मार्केट यार्ड १५)पलूस १६)कुंडल १७)भिलवडी १८)कृष्णा येरळा सुत गिरणी,पलूस १९)अंकलखोप २०)पलूस शहर २१)कवठे महांकाळ २२)ढालगाव २३)शेडगेवाडी फाटा २४)मार्केट यार्ड, जत २५)कडेगाव २६)चिंचणी अंबक २७)कडेपूर २८)आटपाडी २९)खानापूर ३०) वाटेगाव ३१) इस्लामपूर शहर ३२) कासेगाव
सीबीएसच्या माध्यमातून बँकेकडून दिली जात असलेली सेवा / सुविधा
अ) एनी ब्रेंच बँकिंग (ABB) - सीबीएस संगणकीकरणाच्या अनुषंगाने बँकेने एनी ब्रेंच बँकिंग सुविधा सुरु केली आहे. या सुविधेनुसार ग्राहकास बँकेच्या कोणत्याही शाखेमधून रक्कम काढता व रक्कम भरता येते.
ब) APB (आधार पेमेंट ब्रीज सिस्टम) – बँकेने NPCI अंतर्गत आधार पेमेंट ब्रीज सिस्टम सुरु केली आहे. याद्वारे शासनाच्या विविध सबसिडीच्या रक्कमा सरळ खातेदारांच्या खात्यावर जमा होत आहेत.
क) SMS Alert - सेविंग / करंट खात्यावर रक्कम जमा झाल्यावर अथवा नावे पडल्यानंतर सबंधित ग्राहकाच्या मोबाईल वर सत्वर SMS केला जातो.
मोबाईल व्हॅन
ग्रामीण भागामध्ये दुर्गम ठिकाणी तसेच यात्रा व बाजाराच्या ठिकाणी ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता यावेत यासाठी बँकेने मोबाईल व्हॅन सेवा सुरु केलेली आहे. सदर व्हॅन मध्ये TV डिस्प्ले बसवला असून त्यावर बँकेच्या विविध योजना, व्याजदर, इ. माहिती प्रसिद्ध केली जात आहे. तसेच ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराची सवय लागावी या उद्देशाने सदर व्हॅन च्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रबोधन केले जात आहे.
Micro -ATM
ग्राहकांना भविष्यात देणेत येणाऱ्या सुविधा
अ) IMPS (एमीजीएट पेमेंट सिस्टम) – ग्राहकांना मोबाईलच्या माध्यमातून रक्कम जमा करणे व ट्रान्सफर करणे इ. सेवा देणेसाठी बँक लवकरच IMPS सुविधा सुरु करणार आहे.
ब ) नेट बँकिंग - बँक लवकरच सर्व ग्राहकांना नेट बँकिंग द्वारे व्यवहार करणेची सुविधा देणार आहे.