कार्यक्रम आणि बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा बँकेतून 

सोसायट्या, दूध संस्थांना मायक्रो एटीएम- जिल्हा बँकेची 'क्यूआर कोड' सुविधा सुरु

जिल्हा बँकेचा 'क्यूआर कोड' कार्यान्वित

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ

शिराळा शाखेचे भूमिपूजन -जिल्हा बँकेच्या शिराळा शाखेचे भूमिपूजन रविवारी दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बँकेचे उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.


सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व खातेधारकांनी ३० ऑगस्ट २०२२ पूर्वी के. वाय. सी. अपडेट करून घ्यावी. -अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने दुष्काळग्रस्त गावांमध्ये श्रमदान - जिल्हात कमी प्रमाणातील झालेल्या पर्जन्यामुळे जिल्हातील एकूण ७३७ गावांपैकी ५०९ गावे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेली आहेत व त्यापैकी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव व खानापूर या तालुक्तील काही गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत पाणी फौंऊडेशन सारख्या सामाजिक कामकाज करणाऱ्या संस्थेमार्फत दुष्काळ निवारण्याच्या अनुषंगाने विविध कामाचे आयोजन सदर तालुक्यामध्ये केले जात आहे. या सामाजिक कामामध्ये बँकेचा देखिल सहभाग असणे आवश्यक आहे या बाबी विचारात घेउन बँकेच्या दि. १४/०५/२०१९ रोजीच्या मा. कार्यकारी समिती सभेमध्ये पाणी फौंऊडेशन यांनी निवडलेल्या २२ गावांना प्रत्येकी रु. २५,०००/- प्रमाणे एकूण रु. ५,५०,०००/- मात्राची आर्थिक मदत बँकेच्या वतीने देण्यात यावी तसेच प्रत्येक तालुक्यातीला १ गाव निवडून त्या गावामध्ये शनिवार दि. १८/०५/२०१९ रोजी त्या त्या तालुक्यातीला व जवळच्या तालुक्यातीला कर्मचारी यांच्या वतीने श्रमदान करणेत यावे असा निर्णय घेतलेला होता. त्या नुसार बँकेचे मा. अध्यक्ष श्री. दिलीप पाटील व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली दि. १८/०५/२०१९ रोजी देवनगर (ता. खानापूर) , हिवताड (ता. आटपाडी), हातनोली (ता. तासगाव), मोकाशिवाडी (ता. जत), व शेळकेवाडी (ता. कवठेमहांकाळ) या ५ गावामध्ये त्या त्या तालुक्यातीला व जवळच्या तालुक्यातील कर्मचारी याच्या वतीने श्रमदान करणेत आले. सदर वेळी मा. आ. अनिल बाबर , मा. श्री. उदयसिंह रुस्तुमराव देशमुख, मा. सौ. कमल दिनकर पाटील व मा. विक्रमसिंह बाळासो सावंत तसेच बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग, सरव्यवस्थापक एम. बी. पाटील, जे. जे. पाटील व अधिकारी वर्ग उपस्थित राहून श्रमदानामध्ये सहभाग घेतला. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ठेवींचा आकडा ५००० - आटपाडी येथे ग्राहक मेळाव्यात अध्यक्षांची माहिती -बुधवार दिनांक १९ डिसेंबर रोजी आटपाडी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला बँकेचे चेअरमन मा. दिलीपतात्या पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने वाळवा येथे ग्राहक मेळावा घेण्यात आला -सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी वाळवा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बँकेचे चेअरमन मा. दिलीपतात्या पाटील, बँकेचे उपाध्यक्ष तसेच जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मिरज येथे ग्राहक मेळावा घेण्यात आला  - मंगळवार दिनांक २५ डिसेंबर रोजी मिरज येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बँकेचे चेअरमन मा. दिलीपतात्या पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली. 

अटल पेन्शन योजना गौरव - भारत सरकार ने जाहीर केलेली अटल पेन्शन योजना प्रभावीपने राबविल्याबद्दल नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. सांगली चा गौरव करण्यात आला. बँकेमार्फत केलेल्या प्रभावी अंमलबजावणीचा आणि बँकेच्या सेवक वर्गाच्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना आज व्यक्त होत आहे. 

मोबाईल ATM व्हॅन   - ग्रामीण भागामध्ये दुर्गम ठिकाणी तसेच बँकिंग सुविधा नसणाऱ्या गाव, वाड्या-वस्त्यांसाठी आणि यात्रा व बाजाराच्या ठिकाणी ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोबाईल ATM व्हॅन ची सेवा सुरु केली आहे. 

Rupay डेबिट कार्ड - बँकेमार्फत Rupay डेबिट कार्ड तसेच किसान क्रेडीट कार्ड ची सुविधा ग्राहकांसाठीउपलब्ध केलेली आहे, याचा उदघाटन समारंभ मा. अर्थ मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडला.